


Maval News : पश्चिम पट्ट्यात पावसाची जोरदार बॅटींग, पवनेसह पाच नद्यांना पूर
Pckhabar- पश्चिम पट्ट्यात बुधवारी दिवसभर आणि रात्री पावसाने जोरदार बॅटींग केल्याने पवना, इंद्रायणी, कुंडलिका, आंद्रा, सुधा या नद्यानाही पूर आला आहेत. मावळातील भातखाचरे तुडुंब भरले असून दीर्घकाळ रखडलेली भात लागवडी वेगाने सुरु आहेत.
दमदार पावसामुळे मावळातील पवना धरण , आंद्रा धरण, वडिवळे धरण, जाधववाडी धरण, कासारसाई धरण, पुसाणे धरण, आढले धरण, मळवंडी धरणातील पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.
लोणावळा, खंडाळा पवना परिसरातील डोंगरी भागात जोरदार पावसाने मोठमोठे धबधबे वेगाने वाहत आहेत. तर या भागातील वर्षाविहाराचे नैसर्गिक नयनरम्य दृश्य दिसत आहेत.
दरम्यान, आज (गुरूवार) हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.










Leave a Reply