
Pimpri News : तर माझ्या वाढदिवसाच्या जाहिरात फलकांवर कारवाई करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
Pckhabar-वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी होर्डिंग लावू नयेत, असे मी आवाहन केले होते. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी फलक लावले आहेत. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीच्या ठिकाणी परवाना न घेता लागले असतील. तर, पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांनी बिनदिक्कतपणे कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोकपणे सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरभर शुभेच्छा देणारे जाहिरात फलक लावले आहेत. पवार बुधवारी खासगी दौर्यानिमित्त शहरात आले होते.
तुमच्या वाढदिवसानिमित्त काही गुन्हेगारांनीही फलक लावले असल्याचे विचारले असता उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरुन फ्लेक्स लावू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. उद्याच्याला कोणी काय केले. ते चुकीचे असेल. तर, पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी नाही. मी पिंपरी-चिंचवडमध्ये आज नाही, अनेक वर्षे येत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना माझी मते स्पष्टपणे माहिती आहेत. अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितले नाही. मी नियमांचे पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीचे लागले असतील. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांनी कारवाई करावी, असे पवार म्हणाले.










Leave a Reply