
Sangvi News : उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचातर्फे विविध उपक्रम
कोरोना योद्धांचा सन्मान, नागरिकांना वृक्ष वाटप
ई सेवा उपक्रमा अंतर्गत आधार कार्ड, पॅनकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट देण्यात येणार
Pckhabar-उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने आज (बुधवार) विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी दिली.
कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहेत. तसेच ई सेवा उपक्रम राबविण्यात येणार असून, याअंतर्गत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड मोफत काढून देण्यात आहेत. तसेच उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट आदी कागदपत्रेही मोफत काढून देण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, शामभाऊ जगताप युवा मंचचे अध्यक्ष शामभाऊ जगताप, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, युवा नेते तानाजी जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, तृप्ती जवळकर, शहर उपाध्यक्षा उज्ज्वला ढोरे, सुषमा तनपुरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
याबाबत बोलताना शामभाऊ जगताप युवा मंचाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा माजी अध्यक्ष शामभाऊ जगताप म्हणाले” सामाजिक बांधिलकी जोपासत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत”.
कोरोना कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहेत. महा ई सेवा उपक्रम राबविण्यात येणार असून, याअंतर्गत आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड मोफत काढून देण्यात आहेत. उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमासाईल सर्टिफिकेट आदी कागदपत्रेही मोफत काढून देण्यात येणार आहेत, असेही जगताप म्हणाले.










Leave a Reply