
Water News : उद्या एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद; ‘या’ भागात पाणी पुरवठा होणार नाही
Pckhabar-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करण्यात येणार आहे. उद्या (गुरूवार) एमआयडीसीचा सकाळी आणि संध्याकाळी होणारा पाणीसाठा बंद असणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुध्दीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती कामकाज करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी आणि सायंकाळी एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.
‘या’ भागातील पाणी पुरवठा असणार बंद
पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहुरोड, कासारवाडी फुगेवाडी, निगडी, सी.एम. ई. आर अॅन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल., कॅटोंन्मेन्ट बोर्ड, ओ.एफ. डी. आर. या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.










Leave a Reply