Sports News : भारताचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली


Sports News : भारताचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली
Pckhabar- भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात  श्रीलंकेवर 3 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला आहे. या सामान्यांसोबतच भारतीय संघाने ही एकदिवसीय मालिका आपल्या नावे केली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो आणि असालांकाच्या अर्धशतकच्या दमावर श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 275 धावा केल्या.

टीम इंडियाने 49.1 षटकांत 7 गडी गमावून 276 धावांचे लक्ष्य गाठले. दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी  84 धावांची भागीदारी केली. चहरने  7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 82 चेंडूत 69 धावा केल्या. पहिलेच अर्धशतक करणाऱ्या दिपक चहरला सामनावीर घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *