Dehu News : अभंग प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत काळोखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अनाथ व दिव्यांग मुलांसाठी किराणा साहित्य

Dehu News : अभंग प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत काळोखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अनाथ व दिव्यांग मुलांसाठी किराणा साहित्य

Pckhabar-अभंग प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत भागुजी काळोखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त शिरगाव येथील माई बालभवन येथील अनाथ व दिव्यांग मुलांसाठी किराणा साहित्य व देणगी देण्यात आली.

कोरोनाच्या काळात वाढदिवस अशा सेवाभावी सामाजिक संस्थांमध्ये साजरा करण्याच्या या उपक्रमांमुळे समाजापुढे एक चांगला आदर्श व संस्थांनाही सहकार्य लाभत आहे याचे समाधान संस्थेचे व्यवस्थापक मधुकर इंगळे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी शिरगावचे मा. उपसरपंच अमोल गोपाळे, मा.उपसरपंच मारुती गोपाळे, उद्योजक मयूर शेलार, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, उपाध्यक्ष सुरेश गाडे, मा.उपसरपंच अभिजीत काळोखे, सचिन काळोखे, प्रा. विक्रम भोईटे, गणेश काळोखे, कुणाल काळोखे प्रल्हाद काळोखे,चक्रधर काळोखे, अजिंक्य साकोरे, प्रा.विकास कंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *