Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी कोरोना योद्धा’ पुरस्कार


Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी कोरोना योद्धा’ पुरस्कार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्थ पवार फाउंडेशन व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे आयोजन

Pckhabar-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, पार्थ पवार फाउंडेशन तसेच कै.शांताराम बाईत प्रतिष्ठानच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीमध्ये गोरगरीबांना मदत केली, अशा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संजोग वाघेरे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चि.शहर) यांच्या हस्ते राष्ट्रवादी कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रशांत शितोळे (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेंद्र जगताप (मा. नगरसेवक पिं.चि.मनपा राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजी पाडळे (मा. नगरसेवक), अरुण पवार (अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ), शामभाऊ जगताप (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तानाजी जवळकर (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), उज्ज्वला ढोरे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चि.), अमरसिंह आदियाल (युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), शिला भोंडवे (महिला बचत महासंघ), अजित काळभोर (मा.नगरसेवक) यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संजोग वाघेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की आमचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले, ते खरोखर मोलाचे आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील नागरिकांना मदत केली, ती उल्लेखनीय आहे. आज या महागाईच्या काळात गोरगरीब दीनदलित यांना मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. जे मदत मानवाला करतात, त्यांच्यासाठी ते देवदूत म्हणून येतात, असेही ते म्हणाले.

पुरस्कारार्थी अरूण पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मला राष्ट्रवादी काँग्रेस कोरोना योध्दा पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून, काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे. मी यापुढील कालावधीमध्ये गरजूंना मदत करण्यासाठी सदैव बांधील राहील.

यावेळी वैशालीताई काळभोर, लक्ष्मीकांत शास्त्री, रोहन शिंदे, अक्षय कळसकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक रविंद्र बाईत यांनी, तर कार्यक्रमाचे आभार संयोजक अस्मिता कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *