Alandi News : माऊलींचा चल पादुका सोहळा हरिनाम गजरात मार्गस्थ


Alandi News : माऊलींचा चल पादुका सोहळा हरिनाम गजरात मार्गस्थ
Pckhabar- माऊली मंदिर लगत असलेल्या दर्शनबारी सभागृहात तब्बल 17 दिवसांचा पाहुणचार पायी वारी सोहळ्याची परंपरा जपत झाल्यानंतर श्रीगुरु पांडुरंगरायांचे भेटीसाठी आषाढी वारी पालखी सोहळ्याने माऊलींच्या चल पादुकां हरिनाम गजर करीत पंढरीकडे शासन निर्देशांचे पालन करीत 40 मान्यवरांच्या समवेत आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या शिवशाही बसने सकाळी सव्वा  इतिहासात दुसर्‍यांदा मार्गस्थ झाल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, माऊलींचे मानकरी योगीराज कुर्‍हाडे, योगेश आरु, सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार, राजाभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव,  तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस  आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर भाविक उपस्थित होते. पादूका पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात पालखी सोहळ्याचे परंपरा प्रमाणे सकाळी अभिषेख, दुधारती, कीर्तन, परंपरे प्रमाणे आरती झाली. त्यानंतर कर्णेकरी यांनी परंपरेने कर्णा वाजवीत सोहळ्यास निघण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले.
सोहळ्याचे संबंधित घटकांत लगबग सुरु झाली. दरम्यान आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांवर पुष्पहार अर्पण करीत सोहळा निर्विघन पणे पार पडावा यासाठी साकडे घालण्यात आले.  40 वारकरी भाविक, प्रांत विक्रांत चव्हाण आदींचा शाल श्रीफळ देऊन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
बसमध्ये दिंडीवाल्यासह पुजारी, सेवक चोपदार, मानकरी असल्याचे सोहळा प्रमुख व विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले. या बस समवेत पंढरपूरला पर्यंत व परत येई पर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. आजोळघर परिसरासह नगरपरिषद चौकात मोठी गर्दी करून रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिले होते. आळंदी मंदिरासह पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्ठी हेलिकॉप्टरने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *