
Dehu News : राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी सुनिल कडूसकर, उपाध्यक्षपदी कांतीलाल काळोखे यांची नियुक्ती
प्रभाग अध्यक्ष पदी चंद्रकांत भोसले
Pckhabar- पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सुनिल कडूसकर यांची, देहूचे माजी सरपंच कांतीलाल काळोखे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तर चंद्रकांत भोसले यांची प्रभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश जाधव, प्रसिध्दी प्रमुख विशाल परदेशी, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष माणिक जाधव, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश मोरे, युवा नेते प्रशांत काळोखे, कामगार नेते विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आगामी देहूगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने देहूगावमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकिवण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत.










Leave a Reply