Dehu News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादूकांचे शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान

Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादूकांचे आज (सोमवार) सकाळी 9 च्या सुमारास आकर्षक अशा फुलांनी सजविलेल्या शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

यावेळी देहू पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांनी ठिक-ठिकाणी बसवर फुलांची उधळण करत दर्शन घेतले.
कोरोनाच्या संकटामुळे दुसऱ्या वर्षी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदिपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसने पादूका घेऊन जाण्यात येत आहेत.
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागली आहे. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी सलग दुसऱ्या वर्षी बसने मार्गस्थ झाले आहेत.

दरम्यान, आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहेत.











Leave a Reply