Pimpri News: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या क्षेत्रात अजरामर कार्य केले : महापौर

 

Pimpri News: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या क्षेत्रात अजरामर कार्य केले : महापौर

Pckhabar-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून कथा, कादंब-या, पोवाडे, लोकनाट्य, चित्रपट यासारख्या असंख्य प्रतिभासंपन्न साहित्याची निर्मिती करून साहित्याच्या क्षेत्रात अजरामर कार्य केले आहे अशा देश विदेशातील लोकप्रिय, महान व्यक्तिमत्वास आणि त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन करते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आणि निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर माई ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,आयुक्त राजेश पाटील, म.न.से.गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्या सुमन पवळे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डी.पी.खंडाळे,सचिव शिवाजी साळवे,भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे,भगवानराव शिंदे, मनोज तोरडमल, नानासाहेब कसबे,केशरताई लांडगे,आशाताई शहाणे,दत्तू चव्हाण, वसंत वावरे, नितिन घोलप,संजय ससाणे,रामदास कांबळे,सुनिल भिसे,मधूकर गवारे,संदीप जाधव, आबा मांढरे,मयूर गायकवाड, बालाजी गवारे,प्रथमेश आरडे,शिवाजी चव्हाण, अण्णा कसबे, सतिश भवाळ, गणेश साठे, विशाल कसबे,अनिल सोधडे, महेश खिलारे, महादेव साळवे, रवि खैरनार, मेघराज साळवे, कुसुमताई कदम,सविता आव्हाड, मयूर घोलप, स्वप्नील वाघमारे, किशोर हातागळे, मोहन वाघमारे, सुरेश मिसाळ, मीनाताई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या साहित्यरत्न होणे सोपी गोष्ट नाही, लोकशाहीर अण्णाभाऊंनी अथक परिश्रम, जिद्द, सचोटी आणि असंख्य संकटाचा सामना करून त्यांनी हे साहित्य निर्मितीचे महान कार्य निर्माण केले आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासला पाहिजे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
म.न.से.गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, मनोज तोरडमल आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *