Dehu News : ‘आदर्श रक्तदाता’ स्वप्नील आप्पा काळोखे यांचा सन्मान!

Dehu News : ‘आदर्श रक्तदाता’ स्वप्नील आप्पा काळोखे यांचा सन्मान!

तब्बल 18 वेळा केले रक्तदान

Pckhabar-देहूगाव येथील आदर्श उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांनी तब्बल 18 वेळा रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभाग घेत रक्तदान केले. त्याबद्दल काळोखे यांचा ‘आदर्श रक्तदाता’ म्हणून सन्मान करण्यात आला.

दै. ‘लोकमत नाते रक्ताचे’ या मोहिमे अंतर्गत रक्तदान शिबिरात काळोखे यांनी 18 वे रक्तदान केले. या कार्यात सहभाग घेतल्याबद्दल देहूतील सार्वजनिक संस्थानी मिळून ‘आदर्श रक्तदाता’ म्हणून स्वप्नील आप्पा काळोखे यांचा सन्मान केला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव,माजी सरपंच कांतीलाल काळोखे, रोटरी क्लब ऑफ देहूचे अध्यक्ष रामदास साठे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण काळोखे, प्रा. विकास कंद, अॅड. प्रशांत जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशनचे योगेश काळोखे, सागर भसे, युथ क्लब ऑफ देहूचे अनिकेत काळोखे, विकास कंद, सचिन साळुंखे, सागर मोरे, विजय मोरे, नारायण पचपिंड, ॲड. संजय भसे, प्रा. संदीप भोसले, बाळासाहेब काळोखे, सचिन काळोखे, गणेश सावंत, सलिम मुलाणी, दिनेश साळुंखे, अजिंक्य साकोरे, गणेश दरेकर, भैय्यासाहेब कारके, सुरेश गाडे, नितीन गाडे, अभिजीत कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदाते स्वप्नील आप्पा काळोखे म्हणाले ” रक्तदान हे श्रेष्ठदान असून या सारखे पुण्यवान असे कार्य नाही. एखाद्या रूग्णाचा जीव वाचत असेल तर हे वेगळेच समाधान असते. त्यामुळे मला रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाली आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *