Talegaon Dabhade News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर


Talegaon Dabhade News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने माजी अध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयात सोमवारी सकाळी 10 वाजता गरवारे ब्लड बॅकेच्या सहकाऱ्याने हे रक्तदान शिबीर होणार आहे. रोटरीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, नुतन अध्यक्ष सुमती निलवे, वरिष्ठ उपाध्यक्ष विन्सेंट सालेर, सचिव प्रविण भोसले, प्रकल्प प्रमुख रूथ सालेर, प्रकल्प सह प्रमुख डॉ. प्रा. संभाजी मलघे उपस्थित राहणार आहेत.

कोविड-19 च्या राष्ट्रव्यापी महासंकटामुळे रुग्णांना रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. राष्ट्र हित जोपासत सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने जास्तीत-जास्त दात्यांनी  रक्तदान  करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *