Dehu News : मनसेला धक्का; मनसेचे सुदाम मराठे यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Dehu News : मनसेला धक्का; मनसेचे सुदाम मराठे यांचा भाजपमध्ये प्रवेश
Pckhabar- देहूगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. मनसेचे माजी अध्यक्ष सुदाम मराठे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, देहू शहर प्रभारी कैलास आण्णा पानसरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा. मराठे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे देहू शहर भारतीय जनता पक्षाने स्वागत केले.

मराठे यांच्या प्रवेशाने देहू भाजपची ताकद वाढणार असून आगामी नगरपंचायत निवडणुकीत यांचा फायदा होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *