Entertainment News : ‘ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट !’ गाण्याचा सोशल मीडियावर जलवा
Pckhabar- ”ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट !’ गाण्याचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर असो किंवा इंन्स्टाग्राम, फेसबूकच्या स्टोरीज असो हे गाणं प्रत्येकाच्या आपल्याला पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याने प्रत्येकाला वेड लावले आहे. मुख्य म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर युवकांनी सध्याच्या वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर महागाईचे रेट व नेतेमंडळींचे फोटो एडिटिंग करून वाढत्या महागाईला नियंत्रण ठेवण्यासाठी नेतेमंडळींनी लक्ष केंद्रित करावे, असेही सुचवले जात आहे.
हे गाणे गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर सध्या एवढी क्रेझ आहे की, एका मुलाखती दरम्यान उमेश गवळी म्हणाले की, ”या गाण्याचे इन्स्टाग्रामवर अनेक शॉर्ट व्हिडिओ बनवले जात आहेत. तसेच ग्रामीण भागातील व्यक्ती सहज बोलताना देखील “ओ शेठ’ असे बोलून जातो. त्यातून हे गाणे सुचले आहे असे यासाठी प्रणीत व संध्या या माझ्या सहकाऱ्यांनी म्युझिक दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या गाण्याबद्दल रसिक मायबापांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे”,.










Leave a Reply