Pimpri News : शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका शैला खंडागळे यांच्या उपस्थितीत ‘शिव संपर्क’ अभियानास प्रारंभ

Pimpri News : शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका शैला खंडागळे यांच्या उपस्थितीत ‘शिव संपर्क’ अभियानास प्रारंभ
Pckhabar- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव संपर्क अभियान दि.12 ते 24 जुलैमध्ये राबविण्यात येत  आहे. त्या अन्वये पिंपरी-चिंचवड विधानसभा शिव संपर्क अभियान महिला आघाडीच्या वतीने राबविण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने संपर्क संघटिका वैशाली सुर्यवंशी,  जिल्हासंघटिका आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे,  उपजिल्हा संघटिका,
वैशाली मराठे,  चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, पिंपरी विधानसभा संघटिका सरिता साने उपस्थित होत्या.  उपविधानसभा संघटिका, विभागसंघटिका पर्यंतच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

उपस्थित महिलांच्या कामाचा आढावा आणि इच्छुक महिला कश्याप्रकारे पक्षाच्या कामात सक्रिय होतील याचे मार्गदर्शन संपर्क संघटिका यांनी केले. तर जास्तीत-जास्त महिला शिवसेनेशी जोडल्या जातील,  सक्रिय होतील याबद्दल  जिल्हा संघटिका शैला  खंडागळे यांनी मार्गदर्शन केले.

येत्या काळात पक्ष वाढीसाठी योग्य ती पावले उचलली जातील. असे आश्वासन देण्यात आले. सदर अभियान हे 22 जुलै पर्यंत असून त्यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पाहिल्या दिवशी 25  नवीन महिला पक्षात जोडण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *