Pimpri News : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Pimpri News : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Pckhabar-पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर युवासेनेने आज (गुरुवार) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले. यावेळी हातगाडीवर दुचाकी ठेवून त्याला हार घालून वाहनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

 युवासेनेचे शहर अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली या झालेल्या आंदोलनात शहर समन्वयक रुपेश कदम, शहर चिटणीस अभिजीत गोफण, उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके, युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले, पंकज दीक्षित, अक्षय परदेशी, मंदार यळवंडे, करण वाल्हेकर, रोहन शेटे, वतन वाल्हेकर, दिनेश चव्हाण, रवि नगरकर, चासकर, निखिल येवले, राहुल पालांडे, आशिष बाबर, प्रमोद चव्हाण, सागर शिंदे, शरद जाधव आदी सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *