SSC Result News : उद्या दहावीचा निकाल; ‘या’ संकेतस्थळावर निकाल पाहता येणार

SSC Result News : उद्या दहावीचा निकाल; ‘या’ संकेतस्थळावर निकाल पाहता येणार

Pckhabar- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  उद्या (शुक्रवार) दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‘http://result.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता विषयनिहाय मिळालेले गुण संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे.

यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षा न होता, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील जवळपास १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *