Maval News : मावळातील रस्त्याचे डांबरीकरण करा; तहसीलदारांना माकपचे निवेदन

 

Maval News : मावळातील रस्त्याचे डांबरीकरण करा; तहसीलदारांना माकपचे निवेदन
Pckhabar-मावळ तालुक्यातील सुदवडी, जांबवडे या दिड किलोमीटरच्या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या गाड्या घसरत असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेली 8 वर्षे रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे येथील नागरिकांना कामावर जाताना येताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे अशी नागरिकांची मागणी करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांनी
सुदवडी, जांबवडे भागात घरे बांधली आहेत. जिल्हा परिषदेचा निधी असूनही या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. सुमारे 2 हजारहुन जास्त लोकवस्ती येथील नागरिकांना अतिशय मनस्ताप होत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ग्रामीण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कॉम्रेड गणेश दराडे सचिव ग्रामीण यांनी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे याना एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अपर्णा दराडे, विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, विठ्ठल कदम, चंद्रकांत जाधव, पावसु कऱ्हे या कार्यकर्त्यानी तहसीलदार यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *