Talegaon Dabhade News : नियम पाळा, अन्यथा पुन्हा लाॅकडाऊन; नगराध्यक्षाच्या चित्रा जगनाडे यांचा इशारा

Talegaon Dabhade News : नियम पाळा, अन्यथा पुन्हा लाॅकडाऊन; नगराध्यक्षाच्या चित्रा जगनाडे यांचा इशारा
Pckhabar-तळेगाव दाभाडे शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.  नागरिकांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा शहरात पुन्हा लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा नगराध्यक्षाच्या चित्रा जगनाडे यांनी दिला.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तळेगाव शहर हे  कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट असल्याचे जाहीर केले. त्यावर उपाय योजना करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी बैठकीचे आयोजन नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीस सभागृहनेते अरुण भेगडे, नगरसेवक संतोष दाभाडे, नगरसेविका शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, विभावरी दाभाडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयेश बिरारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, भास्कर वाघमारे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.

तळेगाव शहरात खरेदीसाठी बाजार पेठेत मोठी गर्दी होत आहे. अनेक नागरिक सुरक्षित अंतराचे पालन करत नाहीत. मास्क घालत नाहीत. त्यामुळे रूग्ण संख्या वाढत आहे.  शहरातील जिजामाता चौक व स्टेशन चौक येथील मजूर अड्डा, तसेच गाव आणि स्टेशन भागातील भाजी विक्रेते, व्यापारी यांच्या ॲन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट  करत्याचे नियोजन प्रशासना मार्फत करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *