Lonavala News :   एकमेकांना शिव्या घालायच्या आणि एकत्र नांदायचे  हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समीकरण : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

Lonavala News :   एकमेकांना शिव्या घालायच्या आणि एकत्र नांदायचे  हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समीकरण : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Pckhabar- राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहिल याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुस-या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे, अशी टीका, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लोणावळ्यात केली.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शिवक्रांतीचे सरचिटणीस विजय पाळेकर,  नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, अॅड. राहुल पोळ, रमेश पाळेकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतान दरेकर यांनी सांगितले की, कॉंग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला. महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतक-यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झालाय, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही”, अशी टिका दरेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *