Pimpri News : नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी गमावला: महापौर

 

Pimpri News : नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी गमावला: महापौर
Pckhabar- नगरसेविका अर्चना बारणे यांच्या निधनामुळे शहराने एक उत्तम लोकप्रतिनिधी गमावला असल्याची भावना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसदस्या अर्चना बारणे यांचे मंगळवारी जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.  महापालिकेच्या वतीने महापौर माई ढोरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यांना श्रद्धांजली वाहताना महापौर माई ढोरे यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसदस्य केशव घोळवे,  नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, प्रियांका बारसे, अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, उपसंचालक नगररचना प्रभाकर नाळे, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रमुख किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या नगरसेविका अर्चना बारणे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कार्य केले, प्रभाग क्र. २३ मधून निवडून आल्यानंतर त्यांनी ग प्रभाग अध्यक्षा पदाची जबाबदारी देखील सक्षमतेने पार पाडली.  लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  अधिक ऊर्जा आणि सदृढ आरोग्य असेल तर आपण अधिक गतीने काम करु शकतो.  ब-याचदा स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष देखील होते.  जीवन अनमोल आहे यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी प्राधान्याने घेतली पाहिजे.  सध्या कोरोनाची साथ सुरु आहे.   कोरोनामुळे महापालिकेचे ३ लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी, कर्मचा-यांसह काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे आरोग्यासाठी हितावह आहे असे सांगून महापौर माई ढोरे यांनी प्रत्येकाने दक्षता बाळगून आरोग्याबाबत सजग रहावे असेही त्या म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *