Dehu News : अभंग प्रतिष्ठानच्या वतीने चार जिल्हा परिषदेच्या शाळेतील 700 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
Pckhabar-अभंग प्रतिष्ठान देहू यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, देहूगाव विठ्ठलवाडी, माळवाडी, बोडकेवाडी या ठिकाणी 700 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रप्रमुख ससाने सर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सो.काळोखे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे सचिन करडे, मुख्याध्यापक जठर सर , विटकर सर , रसाळ मॅडम, चिंचाणे सर, भोसले सर, नलावडे सर आदी शिक्षक वृंद, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे, उपाध्यक्ष सुरेश गाडे अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले वह्या वाटप यातून निश्चितपणाने कोरोनाच्या संकटातून अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या पालकांना सहकार्य व विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल अशी भावना केंद्रप्रमुख ससाने सर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.










Leave a Reply