Sad News : भाजपच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन
Pckhabar- भारतीय जनता पक्षाच्या थेरगाव येथील नगरसेविका अर्चना तानाजी बारणे यांचे आज (मंगळवार) अल्पशा आजाराने निधन झाले. बारणे यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2017 च्या थेरगाव भागातील प्रभाग २३ मधून अर्चना बारणे या भाजपतर्फे निवडून आल्या होत्या.
अंत्यविधी रात्री ८ वाजता थेरगाव येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.










Leave a Reply