Talegaon Dabhade News : लिंब फाटा येथे उड्डाणपूल उभारा; अन्यथा रस्ता रोको आंदोलन

Talegaon Dabhade News : लिंब फाटा येथे उड्डाणपूल उभारा; अन्यथा रस्ता रोको आंदोलन
Pckhabar-तळेगाव दाभाडे शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या लिंब फाटा येथे सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण जखमीही झाले आहेत. तळेगाव हे वाढणारे शहर असून तळेगावात जुन्या पुणे-मुंबई महार्गावरून जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लिंब फाटा येथे उड्डाणपूल उभारा, सिग्नल बसवावे किंवा स्पीड ब्रेकर तयार करावे. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण माने यांनी दिला आहे.

याबाबत माने यांनी  राज्य रस्ते विकास महामंडळाचे पुणे विभागाचे   कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.

माने यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक 4 वर येथील लिंब फाटा येथे अनेकदा लहान मोठे अपघात झाले आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत राज्याच्या रस्ते विकास महामंडळाला वारंवार निवेदने, सुचना केली आहे. मात्र, अधिकारी या मागणीचा विचारही करत नसून जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. अधिकार्‍यांना   सर्वसामान्य नागरिकांची काही देणे घेणे नाही. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी लिंब फाटा येथे  उड्डाणपूल उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

तसेच याठिकाणी  सिग्नलची व्यवस्था करणे, स्पीड ब्रेेकर करणे, हाय माक्सचे दिवे लावावेत, या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात. अन्यथा 15 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माने यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *