Chikhali Crime News : भरदिवसा तरुणाचा कोयत्याने वार करून खून

Chikhali Crime News : भरदिवसा तरुणाचा कोयत्याने वार करून खून
Pckhabar-चिखलीमध्ये एका तरुणाचा कोयत्याने वार करून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना आज (रविवार) दुपारी साने कॉलनी रोडवर, मोरेवस्ती येथे घडली. भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

कानिफनाथ क्षीरसागर (रा. विद्यानगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कानिफनाथ त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलासोबत सकाळी चिखली परिसरात आले होते. त्यावेळी पिंपरीतून एक मारेकरी त्यांचा पाठलाग करत होता. साने चौकाजवळ आल्यानंतर मारेकऱ्याने कानिफनाथ यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून केला.

चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *