Pimpri News : कन्या विद्यालयास माजी विद्यार्थिनींकडून 50 पुस्तक संच भेट
Pckhabar-अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती… अशीच काहीशी अवस्था झाली होती…कन्या विद्यालयाच्या 1995 सालच्या विद्यार्थिनींची.
कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे येथे आज 1995 सालच्या 12 माजी विद्यार्थिनींनी विद्यालयातील इयत्ता 9 वीच्या हुशार गरीब, होतकरू विद्यार्थिनीस पुस्तक संच भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून एक छोटेखानी कार्यक्रम झाला.
प्रथमतः विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आजी उपशिक्षिका श्रीमती काकडे रोहिणी यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका उनउने भारती यांनी अध्यक्षीय प्रस्तावाला अनुमोदन दिले.
कन्या विद्यालयाच्या आदरणीय पर्यवेक्षिका सौ पाटील उर्मिला यांनी सुरेख प्रस्ताविक केले. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा परिचय करून देत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकाचे पंचवीस हजार किमतीचे एकूण पन्नास संच विद्यालयास भेट दिले. त्यापैकी पाच विद्यार्थिनींना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तक संच वाटप करण्यात आले.
माजी विद्यार्थीनींनी पैकी शैला रंधवे, रोहिणी इंगळे, कैवल्या नाणेकर आणि हेमलाता भिलारे यांनी आपल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा दिला. कन्या विद्यालयातील शिक्षकांनी लावलेली शिस्त, दिलेले संस्कार, प्रेम याविषयी आदर व्यक्त केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेटे शारदा यांनी सर्वांग सुंदर असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आपण केलेले कार्य हे प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. विद्यार्थीनीसाठी उपयुक्त पुस्तके दिल्यामुळे मुलींना अध्ययन करणे सोपे होईल असे सांगितले. माजी विद्यार्थीनी हेमलता भिलारे, रुपाली चासकर, मेनका भिलारे, पल्लवी ढगे, शैला रंधवे, प्राजक्ता डांगे, रोहिणी इंगळे, कैवल्या चौधरी, रेखा पाटील, नीलिमा मोरे, भारती जगताप, शितल बोडके उपस्थित होत्या.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कांबळे विद्या यांनी सर्वांचे भावपूर्ण शब्दात आभार मानले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन व सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती काकडे रोहिणी यांनी केले.










Leave a Reply