Sports News: कोपा अमेरिका;  अर्जेंटिनाने ब्राजीलला १-० ने चारली पराभवाची धूळ

Sports News: कोपा अमेरिका;  अर्जेंटिनाने ब्राजीलला १-० ने चारली पराभवाची धूळ
Pckhabar- कोपा अमेरिका फुटबॉल २०२१ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध ब्राजील यांच्यात पार पडला. ही रोमांचक आणि अटीतटीची लढत ब्राजीलच्या रिओ डि जिनेरियो शहरातील मारकाना स्टेडियममध्ये झाली. दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने १-० ने ब्राजीलला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला असून तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जेंटिनाने ही ट्रॉफी पटकावली आहे.

यापुर्वी १९९३ मध्ये त्यांनी कोपा अमेरिकेचा शेवटचा चषक जिंकला होता. स्टार स्ट्राईकर मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिना संघ २०१५ आणि २०१६ मध्ये कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता.  मात्र त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. मात्र यावेळी संघ सहकारी एंजेल डि मारिया याने मेस्सीचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने एकमात्र गोल करत संघाला जेतेपद मिळवून दिले आहे. मेस्सीने पहिल्यांदाच कोणती मोठी फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *