Article By Dr. Ankush Jadhav : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; लहान मुले आणि आयुर्वेद
Pckhabar-जगातील प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणाऱ्या कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांसाठी, तर दुसरी लाट तरुणांसाठी घातक होती. आता येणारी संभाव्य तिसरी लाट ही १८ वर्षाखालील मुलांसाठी घातक असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
भारतात वयानुसार मुलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
०ते ४–११कोटी, ५ ते ९–१२ कोटी,१० ते १४–१२ कोटी व १५ ते १९–१० कोटी अशी साधारणतः४५ कोटी इतकी मुलांची संख्या आहे. त्यामुळे संभाव्य लाटेचा काळजी घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २१ या काळातील वयोगटानुसार कोरोना बाधित मुलांचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते.
० ते ५- १.३ टक्के,६ ते ११-२.४ टक्के,१२ ते १७ -४.१ टक्के. असे एकूण ७.८इतके होते. राज्यभरात मे २१ मध्ये बळी पडलेल्या मुलांचे प्रमाण ०.०७ टक्के इतके आहे. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे, सर्दी वा नाक चोंदणे, खोकला, वास वा चव जाणे हीच सर्वसाधारणपणे मोठ्या माणसांमध्ये दिसून येणारी लक्षणेच मुलांमध्ये दिसून येतात. संभाव्य लाटेत ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर सर्वात प्रथम पालकांनी घाबरून जाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील चिकित्सा औषधे, विलगिकरण इ.करावे.
कोरोनाबाधित मुले बरे झाल्यावर यांच्यात काही लक्षणे आढळून येतात. कोरोना झालेल्या मुलांमध्ये करोना विषाणू संसर्गाशी लढतांना शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. ही प्रतिपिंडे संरक्षणांसाठी तयार होतात. परंतु काही वेळा ही अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यास ती शरीरास हानी पोहोचवतात. यालाच “एमआयएससी” (मल्टिसिस्टीम इंफ्लेमशन सिन्ड्रोम इन चिल्ड्रन्स) असे म्हणतात. मूल पूर्ण बरे झाल्यावर सुद्धा दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत ताप, अंगावर लालसर चट्टे येणे, डोळे व ओठ लाल होणे, अंगाची खाज होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. बरेच वेळा या व्यतिरिक्त ताप, सर्दी-खोकला, उलटया, जुलाब या सारखे पोटाचे विकार ,पक्षाघात इ. लक्षणे ही दिसून येतात(पोस्ट कोविड लक्षणे).
संभाव्य लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने राज्य स्तरावर बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन केला आहे. मुलांच्या उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयास्तरावर पायाभूत सुविधा उभारण्याची पूर्व तयारी सुरू केली आहे. या तिसऱ्या लाटेविषयी तज्ज्ञांत मतमतांतरे अधिक आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास हा आजार होतो म्हणून मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगला, सकस आहार द्यावा. स्वच्छता ठेवावी.
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती व सर्वंकष वाढ करणारी काही औषधे
पूर्वी व आता ही काही घरात जन्मगुटी वा बालगुटी दिली जात होती, दिली जाते. त्याने मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढून बरेच आजार होत नाहीत. मुलं सशक्त होतात. ती बालगुटी जास्त प्रमाणात मुलांला द्यावी. बडीशेप, बडीशेपेचे मूळ, वावडिंग, बहव्याच्या शेंगेचा मगज, सोनामुखी, बालहिरडा,
मोठा हिरडा, वेखंड,
अंजीर, ओवा, गुलाबाची फुले, पळसाचे बी, मनुका, गूळ, टाकणखार ही सर्व(जी उपलब्ध होतील ती) द्रव्ये एकत्र करून काढा करावा व तो २० ते ३०मि. लि. प्रमाणात दिवसातून २/३ वेळा द्यावा.
बालगुटी वा जन्मगुटी २
-अश्वगंधा, अतिविष, मुरुडशेंग,
बालहिरडा, जायफळ,
खारीक, बदाम, ज्येष्ठमध,
डिकेमाळी, वेखंड, काकडशिंगी,
सुंठ ही सर्व द्रव्ये सहाने वर उगाळून ती लहान बाळांना चाटवावे. मोठ्या मुलांनी यांचे चूर्ण करून १ ते२ ग्राम या प्रमाणात दिवसातून २/३ वेळा मध, दूध वा पाण्याबरोबर द्यावे. बालगुटी तयार मिळते. तिचाही उपयोग करायला हरकत नाही. च्यवनप्राश द्यावा. सद्या च्यवनप्राश चॉकलेट ही उपलब्ध आहेत.
अरविंदासव १० ते १५ मि. लि. या प्रमाणात दिवसातून २/३वेळा द्यावे. मोठया मुलांसाठी १५ ते २० मि. लि. द्यावे. हे मुलांचे अनेक रोग दूर करून बल, पुष्टी करते.
बालार्क रस वा बालरोगांतक रस, मुक्तादि वटी बाल जीवन वटी या पैकी कोणत्याही एका औषधांच्या गोळ्या दिवसातून २/३ वेळा तर मोठ्या मुलांसाठी सकाळी २ व रात्री २ द्याव्यात. शेंगदाणे व गूळ खाण्यास द्यावा. गूळ व खोबरे मोठया मुलांना खाण्यास द्यावे. चायनीज वा इन्स्टंट पदार्थ मुलांना देऊ नयेत.
डॉ. अंकुश जाधव
माजी सहायक संचालक,
आयुष मंत्रालय, भारत सरकार










Leave a Reply