Pimpri News : पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 23 सराईत गुन्हेगार तडीपार

Pimpri News : पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 23 सराईत गुन्हेगार तडीपार

दिड वर्षात 98 सराईत गुन्हेगारांना तडीपार
Pckhabar-उद्योगनगरीतील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीसांनी धडाकेबाज पावले उचलली आहेत. शनिवारी शहरातील तब्बल 23 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रथमेश उर्फ लखन राजाराम कवडे (वय 21, रा. आकुर्डी), युसूफ मेहबूब कोरबू (वय 29), जाकीर उर्पै डॅनी कय्यूम पठाण (वय 20),  शिहीद साजीद शेख (वय 29), युवराज रतन राजपुरोहित (वय 22), ऋतिक अनिल सकट (वय 19, सर्व रा. ओटास्कीम, निगडी), रोहित चंद्रकांत मुद्दे (वय 22, रा. आंबेडकरनगर, चिंचवड), योगेश बाळू सोनवणे (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड), पिंपरी पोलीस ठाणे हद्दीतील राजु मरिबा कांबळे (वय 29), विशाल उर्फ दाद्या मरिबा कांबळे (वय 34, दोघे रा. मोहननगर, चिंचवड), योगेश राजू बंदपट्टे (वय 23, रा. खराळवाडी, पिंपरी), हर्षल उर्पै गबछया रामदास पवार (वय 28), विजय धनाजी पवार (वय 41), सागर नामदेव तांदळे (वय 32, तिघे रा. नेहरूनगर, पिंपरी), जय दिलीप बिरजे (वय 26, रा. भारतनगर, पिंपरी), भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील निलेश उर्फ बाबा अंकुश लांडे (वय 34), मंगेश उर्फ अमोल अंकुश लांडे (वय 27, दोघे रा. कासारवाडी), रूपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय 28, रा. भोसरी), एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील सत्यशील सिद्धार्थ इंगोले (वय 27, रा. बालाजीनगर, भोसरी), विशाल भिमराव हाके (वय 30, रा. आदर्शनगर, मोशी), सुरज उर्पै डिप्शा महादेव गायकवाड (वय 23, महात्मा फुलेनगर, भोसरी), आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील अर्जून नामदेव त्रिभुवन (वय 23, रा. धानोरे, ता. खेड), ओंकार रमेश चव्हाण (वय 21, रा. आळंदी) अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या गुन्हेगारांना 10 जुलैपासून दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ एक अंतर्गत सन 2020 मध्ये 49 सराईत गुन्हेगारांना आणि सन 2021 मध्ये आतापर्यंत 49 अशा 98 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *