क्रिकेटर हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा बनला

क्रिकेटर हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा बनला

Pckhabar-टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhjan Singh) दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. हरभजनची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) हिने मुलाला जन्म दिलाय. हरभजननं ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी सर्वांना शेअर केली आहे.

आई आणि मुलगा दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचं हरभजननं म्हंटले आहे. हरभजननं जुलै महिन्यात आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. हरभजनचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

हरभजन आणि गीता बसराने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न केले होते. त्यांना 5 वर्षांची एक मुलगी असून तिचे नाव हिनाया आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *