
Dehu News : वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन
Pckhabar- देहूगाव येथील सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने कोरोनाच्या या संकटकाळात पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी ‘कोरोना : दंतकथा आणि वास्तव’ या विषयावर देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे व्याख्यान उद्या (रविवार) सायं. ५ ते ६ या कालावधीत झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे.
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावरील शिक्षण प्रक्रीयेमध्ये शिक्षकांप्रमाणेच पालकांची देखील फार मोठी जबाबदारी आहे. पालकांमध्ये ही जाणीव जागृती व्हावी या भावनेतूनच सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून गेली महिनाभर प्रत्येक रविवारी पालकांसाठी विशेष कार्यक्रमा अंतर्गत आभासी पद्धतीने व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती
सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य डॉ. कविता अय्यर यांनी दिली.











Leave a Reply