Maval News : पवना धरण परिसरात पावसाला सुरूवात;  बळीराजा सुखावला

 

Maval News : पवना धरण परिसरात पावसाला सुरूवात;  बळीराजा सुखावला
Pckhabar- गेल्या 10 -12 दिवसांपासून गायब झालेल्या पावसाला गुरुवारपासून पुन्हा सुरूवात झाली आहे. मावळ तालुक्यात आणि पिंपरी- चिंचवड शहरवासीयांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या तुरळक पावसाने खरीप भात पिकाच्या रोपांना जीवदान मिळण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

मान्सूनच्या पावसाने जून महिन्यात प्रचंड ताण दिल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. खरीप भात लागवडीच्या टप्प्यात मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या भात लावण्या लांबणीवर पडल्या होत्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते अखेर गुरुवारपासून तालुक्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

पवना धरणातील पाणी साठ्याची परिस्थिती :

गेल्या २४ तासात झालेला पाऊस = *25मि.मि.*

💦 १ जूनपासून झालेला पाऊस = *570मि.मि.*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 386
💦 धरणातील सध्याचा पाणीसाठा = *33.94% टक्के*

💦 गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = * 32.76% टक्के*

💦 गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.00% टक्के*

💦 १ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *2.35% टक्के*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *