Wakad Crime News : जमिनीवर ताबा मारून शिक्षकाची फसवणूक  

Wakad Crime News : जमिनीवर ताबा मारून शिक्षकाची फसवणूक
तिघांवर गुन्हा दाखल
Pckhabar- जमिनीचे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार केल्यानंतर देखील जमिनीवर ताबा मारणार्‍या तिघांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 एप्रिल 2016 ते सात जुलै 2021 या कालावधीत काळेवाडीमध्ये घडला.
विठ्ठल कोंडीबा जाधव (रा. तापकीरनगर, काळेवाडी), ज्ञानेश्वर गणपत नखाते (रा. नखातेनगर, रहाटणी), दत्तात्रय भाऊसाहेब कदम (रा. तांबे शाळेमागे, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रामकृष्ण महादेव पदमने (वय 33, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी काळेवाडी येथे जमीन खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी आरोपींना चार लाख रुपये दिले. त्यानंतर जमीन ताबा, साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र फिर्यादी यांच्या नावे करण्यात आले. त्यानंतर एप्रिल 2017 ते जुलै 2017 या कालावधीत संतोष बधाले यांनी फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या जागेवर ताबा मारल्याचे आढळले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी विठ्ठल जाधव यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *