Pimpri News: शिवसेनेचा उद्या
आकुर्डीत मेळावा; खासदार संजय राऊत करणार मार्गदर्शन
Pckhabar-: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी शहराच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत उद्या (शुक्रवार) शिवसैनिकांचा मेळावा घेणार आहेत.
आकुर्डी येथील सीजन बँक्वेट हॉल, जेम्स क्रिस्टल, तिसरा मजला येथे हा मेळावा पार पडणार आहे.
दरम्यान सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत शहरातील तीनही विधानससभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. १०.३० ते ११.३० पिंपरी विधानसभा, ११.३० ते १२.३० चिंचवड विधानसभा आणि १२.३० ते १.३० भोसरी विधानसभा अशा विधानसभानिहाय बैठका होणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, खासदार श्रीरंग बारणे, उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित उपस्थित राहणार आहेत.
शहरातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक, महिला संघटक, गटप्रमुख अशा सर्व पदाधिका-यांना खासदार राऊत मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात नवीन पदाधिका-यांची निवड देखील केली जाणार आहे. त्याची अधिकृत घोषणा खासदार राऊत करणार आहेत.










Leave a Reply