
Dehu News : देहू संस्थांतर्फे नगरसेवक पंकज भालेकर यांचा सन्मान
Pckhabar- देहू आळंदी वारी मार्गावर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतर्फे महा प्रवेश द्वार उभारण्यासाठी नगरसेवक पंकज भालेकर यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे देहू संस्थांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला वारीकाळात भालेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली
यावेळी संत देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प नितीन महाराज मोरे, मा. विश्वस्त ह.भ.प.रामभाऊ महाराज मोरे, वैभव मोरे, प्रकाश मोरे व बाळासाहेब पानसरे उपसरपंच निघोजे इ. मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने व नगरसेवक पंकज भालेकर यांच्या संकल्पनेतून व विशेष पाठपुराव्याने देहू आळंदी वारी मार्गावर तळवडे येथे म.न.पा हद्दीत महाप्रवेशद्वार उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच येथे वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला साजेसे महाप्रवेशद्वार साकारले जाणार आहे.










Leave a Reply