
Hinjawadi News : कोणी लस देता का लस!
Pckhabar-‘कोणी लस देत का लस’ या आशयाचे होर्डींग पिंपरी – चिंचवडच्या हिंजवडी परिसरात लावण्यात आले आहेत.
हिंजवडीकरांना कोरोना लस मिळत नसल्याने हिंजवडीतील त्रस्त नागरिकांनकडून हे होर्डींग लावण्यात आले आहेत. त्रस्त ग्रामस्थ हिंजवडीकर अस लिहत हे होर्डींग लावण्यात आले आहेत की कोरोना लसीसाठी हिंजवडीकर सकाळी पाच वाजल्या पासून लसीकरण केंद्रात रांगेत लागतात. मात्र फक्त 50 जणांनाच टोकन देऊन लस देण्यात येते. उर्वरित रांगेत थांबलेल्या 120 ते 220 लोकांना लस घायची असल्यास त्यांना सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य किंवा गाव पुढाऱ्यांकडून लस घेण्याचा फॉर्म मिळतो.
हिंजवडीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य किंवा गाव पुढारी आपापल्या मर्जीतील लोकांना लस मिळवून देण्यासाठी फॉर्म मिळवून देतात. त्यामुळे बाकीच्या नागरिकांना लस मिळत नसल्याचा आरोप या होर्डींगमध्ये करण्यात आला आहे.










Leave a Reply