Bhosari Crime News: पैसे मोजण्याच्या बहाण्याने हातोहात 70 हजार लंपास केले

Bhosari Crime News: पैसे मोजण्याच्या बहाण्याने हातोहात 70 हजार लंपास केले
Pckhabar- बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या तरूणाचे पैसे मोजण्याच्या बहाण्याने एका अऩोळखी व्यक्तीने हातचलाखी करून 70 हजार रूपये लंपास केले. ही घटना भोसरीतील युनियन बँकेत सोमवारी सकाळी दहा वाजता घडली.
संजित रामाशंकर गुप्ता (वय-18,रा. धावडे वस्ती, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजित हा सोमवारी इंद्रायणीनगर येथील युनियन बँकेत पैसे भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी एका अनोळखी तरूणांने  संजितचा विश्वास संपादन करून पैसे मोजून व बँकेत भरतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने आरोपीकडे 70 हजार रूपये दिले. मात्र, पैसे घेऊन आरोपी तरूण बँकेतून पसार झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *