Dehu News : देहू नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अंकुश जाधव
Pckhabar-देहू नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आळंदी नगरपरिषदचे कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव यांची आज (सोमवार)नेमणुक करण्यात आली आहे.
याबाबत देहू शहर भाजपने नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले आहे. अंकुश जाधव यांनी देहू नगरपंचायतीचा आज (सोमवार)पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, नगरपंचायतचा कारभार मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे हंगामी प्रशासक म्हणून सोपविला होता. त्यांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे
देहू नगरपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी देहू शहर भाजपचे शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांनी केली होती.










Leave a Reply