Pimpri Crime News : कला दिग्दर्शक राजेश सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा, एकाला अटक

Pimpri Crime News : कला दिग्दर्शक राजेश सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा, एकाला अटक

Pckhabar-कला दिग्दर्शक राजेश सापते यांनी शनिवारी सकाळी ताथवडे येथे  राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी  पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे

नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सापते यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असे आत्महत्या केलेल्या राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *