Dehu News : मुलभूत सुविधांचा प्रश्न आठ दिवसात सोडवू; प्रशासक मधुसुदन बर्गे यांचे भाजप शिष्टमंडळास आश्वासन

 

Dehu News : मुलभूत सुविधांचा प्रश्न आठ दिवसात सोडवू; प्रशासक मधुसुदन बर्गे यांचे भाजप शिष्टमंडळास आश्वासन

Pckhabar- विज बिल भरले नसल्याने महावितरणने विज पुरवठा खंडीत केल्याने देहूकरांचा दोन दिवस पाणी पुरवठा बंद होता. यामुळे देहूकरांना
त्रास सहन करावा लागला. देहूत पाणी पुरवठा प्रश्नासह विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत नगरपंचायतचे प्रशासक मधुसुदन बर्गे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध मुलभूत सुविधा पुरविण्यात येणा-या अडचणी समजून घेतल्या. त्यावरील उपाय योजना या मुद्द्यावर चर्चा केली.

भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्या नेतृत्वात देहू शहर भारतीय जनता पक्ष शिष्टमंडळाने नगरपंचायत कार्यालयात बैठक घेतली.

या सर्व तक्रारी पुढील आठ दिवसांत सोडविण्याचं आश्वासन दिले. याप्रसंगी माजी उपसरपंच संतोष हगवणे, व्हाईस चेअरमन नारायण तात्या पचपिंड, पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस ॲड. प्रफुल्ल टिळेकर, मावळ तालुका उपाध्यक्ष संभाजी टिळेकर, किसान आघाडी उपाध्यक्ष संभाजी बाळसराफ, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष शिवलिंग करवीर, ग्रामस्थ इ. कार्यकर्ते अव्वल कारकून महेश वाळके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *