Maharashtra News: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद

Maharashtra News: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद

ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

Pckhabar- शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे  नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

यावेळी शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकारी यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक यासाठी उपस्थितीत असतात. पण सलग दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्यामुळे यंदाही सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *