Chinchwad News: शहर शिवसेनेच्या युवा अधिकारीपदी विश्वजित बारणे
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या युवा अधिकारीपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेनाप्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
विश्वजित बारणे हे चिंचवड विधानसभा युवा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये मोठे कार्य केले. गोरगरिबांना अन्नधान्यासह विविध प्रकारची मदत केली. कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेची जबाबदारी सोपवली आहे.










Leave a Reply