Maval News : सूदवडी, जांबवडे रस्त्याची दुरावस्था; नागरिकांना नाहक त्रास
Pckhabar- सुदवडी, जांबवडे या दिड किलोमीटरच्या रस्त्याची पावसामुळे अतिशय दुरावस्था झाली. संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या गाड्या घसरत असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेली 8 वर्षे रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे येथील नागरिकांना कामावर जाताना येताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे अशी नागरिकांची मागणी करत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांनी
सुदवडी, जांबवडे भागात घरे बांधली आहेत. जिल्हा परिषदेचा निधी असूनही या रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. सुमारे 2 हजारहुन जास्त लोकवस्ती येथील नागरिकांना अतिशय मनस्ताप होत आहे. या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण लवकर करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा समितीचे नेते कॉम्रेड गणेश दराडे यांनी केली आहे.










Leave a Reply