Maharashtra News : आशा सेविकांच्या विविध मागण्या राज्य सरकारने तत्काळ मान्य कराव्यात

Maharashtra News : आशा सेविकांच्या विविध मागण्या राज्य सरकारने तत्काळ मान्य कराव्यात

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांची मागणी

Pckhabar-कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या ‘आशा सेविका’ यांचे मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.

याबाबत उमा खापरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोरोना काळात आशा सेविकांनी गेली दीड वर्षे काम केले, अजूनही करीत आहेत. मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटाइझर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. अनेक आशा सेविकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नियमानुसा, ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागत आहे. मात्र, या कामाची राज्य सरकारला किंमत नाही, अशी टीकाही खापरे यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाबरोबर लसीकरण मोहिमेतही राज्य सरकारने आशा सेविकांचा समावेश केला. मात्र, अजून या कामाचा पुरेसा मोबदला दिलेला नाही. आता तरी राज्य सकरारने आशा सेविकांच्या मागण्यांची पूर्तता करावी. आशा सेविकांच्या मागण्या मान्य करण्याची आश्वासने अनेकदा मिळाली आहेत. मात्र, ही आश्वासने न पाळून सरकार आशा सेविकांची फसवणूक करत आहे. आशा सेविकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी राज्य सरकारने घेतलेली नाही.

राज्य सरकारने गेल्या वर्षीपासूनच प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन ५०० रुपये प्रमाणे द्यावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चाही झाली. मात्र, राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोपही खापरे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *