Pimpri News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साप्ताहिक पुजेचा ६ वा वर्धापनदिन साजरा

Pimpri News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साप्ताहिक पुजेचा ६ वा वर्धापनदिन साजरा

६ व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिकेचे
उपअभियंता विजय भोजने यांच्या हस्ते पुजा
Pckhabar- पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याची दर रविवारी पुष्पहार अर्पण करून पुजा केली जाते. ६ व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी महापालिकेचे
उपअभियंता तथा बीआरटीएस विभागाचे प्रवक्ता विजय भोजने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली.

दि.३१ मे २०१५ रोजी पुतळ्यास मेघडंबरी नगरसदस्या आशाताई शेंडगे-धायगुडे , महानगरपालिकेतील अधिकारी तसेच शहरातील समाज बांधवांच्या पुढाकाराने करण्यात आली.

दिपक भोजने यांच्या कल्पनेतून समाज बांधव एकत्रित कसे जमा होतील यासाठी त्यांनी दर रविवारी पुण्यश्लोक अहिल्यामातेची पुजा करायची ही कल्पना त्यांनी आपल्या सहकार्य सांगितले. त्या सर्वाना पटली दि.६ जुन २०१५ रोजी रविवार या दिवसापासून दर रविवारी अखंडित पुजा होत गेली. बघताबघता ६ वर्ष पूर्ण झाले कोरोना काळात सुध्दा शासकीय नियम पाळुन पुजा करण्यात आली. या पुजेच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले.

विजय भोजने म्हणाले की ”हा जो उपक्रम शहरातील समाज बांधवांनी राबवला आहे, याचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे. पुजेचे निमित्ताने जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित होतील या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. कोरोना कालावधीमध्ये लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून अखंडपणे साप्ताहिक पूजेचा कार्यक्रम चालू ठेवला होता ही कौतुक करण्यासारखी बाब आहे.”

दिपक भोजने व सहकारी यांचे कौतुक केले. या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती व दर रविवारच्या साप्ताहिक पुजेच्या निमित्त आनोखे अभिवादन करण्याचे निमित्ताने प्रत्येक समाज बांधवाने एक २०० पानी वही व एक पेन व इतर शैक्षणिक साहित्य भेट करा व इतरांना सांगा. जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. साप्ताहिक पूजेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल गणेश एकळ , विजय महानवर , बंडू लोखंडे , राहुल मदने , दादासाहेब कोपनर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता पाटील महावीर काळे, महादेव देशमुख , संजय कवितके, धनजय गाडे , सुनिल बनसोडे , विभिषण घोडके, दादा खरात , विनोद बरकडे, अशोक महानवर , व इतर समाज बांधव उपस्थित होते.

दिपक भोजने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *