Pimpri Crime News : बनावट कागद पत्राच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन; दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Pckhabar- ज्या आरोपींना जामीनदार मिळत नाहीत, अशा आरोपींना शोधून बनावट कागद पत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी न्यायालयात हजर राहून मदत करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुनील मारूती गायकवाड (वय- 52, रा. चावडी चौक, आळंदी), नंदा एकनाथ थोरात (वय-43, रा. आळंदी), पौर्णिमा प्रशांत काटे (वय-30, रा. आळंदी), सलमान ताजुद्दीन मुजावर (वय-24) समाधान प्रभाकर गायकवाड (वय- 23), श्रीधर मगन शिंदे (वय-23, तिघेही रा. गुलाब काटे चाळ, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यानुसार पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर, उमेश देवचंद वानखेडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी आदी गंभीर गुन्ह्यातील ज्या आरोपींना जामीनदार मिळत नाहीत, अशा आरोपींचा शोध आरोपी घेत होते. बनावट नावाने बनविलेल्या आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आदी कागद पत्रांच्या आधारे जामीन देण्यासाठी न्यायालयात हजर राहून मदत करत होते. अशा प्रकारे आरोपींनी पिंपरीतील मोरवाडी, शिवाजीनगर न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करुन आरोपींना जामीन देण्यास मदत करून न्यायालयाची दिशाभूल केली आहे.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना गजाआड केले आहे.
पिंपरी पोलीस तपास करत आहेत.










Leave a Reply