Pimpri News : काळ्या फिती लावून वायसीएममधील परिचारिकांचे आंदोलन

Pimpri News : काळ्या फिती लावून वायसीएममधील परिचारिकांचे आंदोलन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मानधनावर नोकरी करणाऱ्या परिचारिकांनी आपणाला महापालिका सेवेत कायम नोकरीवर घ्यावे या मागणीसाठी आज (मंगळवार) काळ्या फीती लावून आंदोलन केले.

गेल्या 12 वर्षांपासून अनेक परिचारिका वायसीएममध्ये मानधनावर कार्यरत आहेत. त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा आणि इतर आर्थिक लाभ दिले जात नाहीत. या परिचारिकांना महापालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने महासभेमध्ये ठराव केले. त्याला महापौर उषा ढोरे यांनी मान्यता दिली. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप त्यांना महापालिका सेवेते सामावून घेण्यात आले नाही. कोरोनाकाळात परिचारिकांना कायमस्वरुपी करुन घेणार, पगारवाढ देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. परंतु या आश्वासनांची पूर्तता तर दूरच या परिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
दरम्यान, आंदोलक परिचारिकांची आमदार महेश लांडगे यांनी भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *