Maval News : इंदोरीत उद्या मोफत कोरोना RTPCR तपासणी
Pckhabar-प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे अंतर्गत उपकेंद्र इंदोरी येथे, ग्रामपंचायत इंदोरी व माळवाडी येथील कोविड रुग्णांच्या संपर्कातील तसेच कोविड संशयित रुग्णांची उद्या ( मंगळवार) मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय इंदोरी व माळवाडी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या पुढाकाराने रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे तसेच संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. सदर तपासणीकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तपासणी तज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ मार्फत कोविड तपासणी केली जाणार आहे.
इंदोरी, माळवाडी गाव कोरोना मुक्त गाव करण्याचा मानस आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आदी कोविड संशयित लक्षणे असलेल्या नागरिकांनी आणि कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांनी RTPCR तपासणी करून घ्यावी, असे आवाहन इंदोरी व माळवाडी गावचे सरपंच, सदस्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. अमिता राज्याध्यक्ष, आरोग्य सहाय्यक सुधाकर चाबुकस्वार ग्रामसेवक, आशा सेविका यांनी केले आहे.










Leave a Reply