Talegaon Dabhade News :
दिव्यांग नागरिकांसाठी उद्या कोविड प्रतिबंधक लसीकरण
Pckhabar- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्याअंतर्गत उद्या (सोमवार) प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे, अंकित रेल्वे स्टेशन जवळील जनरल हॉस्पिटल रिक्रिएशन हॉलमध्ये 45 वर्षांपुढील सर्व दिव्यांग नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे शहर व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे अंकित ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व 45 वर्षेवरील दिव्यांग व्यक्तींना सेवा देण्यात देण्याकरता आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, महिला मंडळ, गाव दक्षता समित्या तसेच सामाि कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीचे लसीकरण मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
ज्या 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तीने पहिला डोस घेतलेला असेल व ज्यांचे दुसरा कोविड डोस देय असेल, त्यांचे लसीकरण करून घ्यावे, ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांचे प्रत्यक्ष नोंदणी करून लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तीचे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीतून एखाद्या दिव्यांग व्यक्तीचे नाव राहिले असल्यास त्यांनाही लसीकरणाचा लाभ घ्यावे असे आवाहन तळेगाव दाभाडेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे, जयेश बिरारी आणि पुंजाजी फोले यांनी केले आहे.










Leave a Reply